DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मोठी बातमी! ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, पहिल्यांदाच 20 हजार रुपये दिंडीला अनुदान

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चारधाम यात्रेसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याबाबतची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीद्वारे तिर्थदर्शन लक्षवेधी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( म्हणाले की, महाराष्ट्र संताची भुमी आहे. पांडुरंगाची वारी सुरु आहे. आपण पहिल्यांदाच 20 हजार रुपये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याबाबात नियम ठरवू असे मुख्यमंत्री म्हणाले. दरवर्षी नियमावली करुन आपण किती लोकांना पाठवू शकतो हे ठरवू. बाय रोटेशनप्रमाणे ही योजना सुलभपणे राबवू असे मुख्यमंत्री म्हणाले. काही जणांची इच्छा असते पण ते लोक जाऊ शकत नाहीत. अशा ज्येष्ठांना नागरिकांनासाठी ही योजना लागू करु असे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेचा आशिर्वाद सरकारला मिळेल. आम्ही नवीन नवीन निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. लाडकी बहिण योजना आपण सुरु केली आहे. तर काही लोक म्हणाले की आरे लाडका भाऊ कुठे गेला. तर आम्ही लाडक्या भावाचा देखील निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

 

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.