धरणगाव..दोन हजारांची लाच घेताना गटशिक्षणाधिकारी यांच्यासह एकाला अटक
दोन हजारांची लाच घेताना गटशिक्षणाधिकारी यांच्यासह एकाला अटक
धरणगाव (प्रतिनिधी ) – दोन हजार रुपयांची लाच घेतांना गटशिक्षणाधिकारी यांच्यासह एकाला जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तक्रारदार यांच्या मालकीची पाळधी खुर्द येथे शाळा आहे. आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्यामागे ८ हजार रूपये असे एकुण १७ विद्यार्थ्यांप्रमाणे एकुण १ लाख ३६ हजार रूपयांची अनुदानाची रक्कम मंजूर होण्यासाठी अनुकुल अहवाल सादर करण्यासाठी २ हजार रूपयांची मागणी गटशिक्षणाधिकारी अशोक दामू बिऱ्हाडे रा. राधाकृष्ण नगर, पिंपळे रोड अमळनेर आणि विभगातील कर्मचारी तुळशीराम भगवान सैंदाणे रा. गट साधन केंद्र, पंचायत समिती धरणगाव यांनी ३० डिसेंबर रोजी २ हजार रूपयांची लाचेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून सोमवारी २४ जानेवारी रोजी गटशिक्षणाधिकारी यांच्या सांगण्यावरून तुळशीराम सैंदाणे याने २ हजार रूपये घेतांना जळगाव लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.