DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच…

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : हल्लीच्या परिस्थितीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, लोक बेरोजगार झाले आहेत. ही समस्या लक्षात घेऊन सरकारने देशात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना सुरू केली आहे. ही योजना नागरिकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. योजनेच्या माध्यमातून स्वत:चा रोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या बेरोजगार नागरिकांना सुरू करता येणार आहे.

 

यासाठी त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार त्यांना कर्ज देणार आहे. तुम्हालाही जिल्हा उद्योग कर्ज योजना लागू करून लाभ मिळवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागणार आहे.

 

आज आपण याच योजनेशी संबंधित सर्व माहिती जाणून घेणार आहोत. जिल्हा उद्योग केंद्र कर्जासाठी अर्ज कसा करावा? जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना 2022 साठी आवश्यक कागदपत्रे, उद्देश, पात्रता, फायदे आणि वैशिष्ट्ये, याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा…

 जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना फॉर्म : 2022

ही योजना देशातील बेरोजगार तरुण नागरिकांसाठी बनवण्यात आली आहे. जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेंतर्गत रोजगार सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून कमी व्याजावर कर्ज दिलं जातं.जेणेकरून त्यांना त्यांचा व्यवसाय सहज सुरू करता येईल. अर्जदाराने पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे तरच तो योजनेचा लाभ घेऊ शकेल.

 

सरकार नागरिकांना व्यवसाय  क्षेत्रासाठी 10 लाख रुपयांपर्यंत आणि उत्पादन (Production) क्षेत्रासाठी 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे. ही कर्जाची रक्कम अर्जदाराला 7 वर्षांच्या कालावधीत फेडावी लागणार आहे. नागरिकांना फक्त 4% व्याजदराने कर्ज दिलं जाईल. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराला जिल्हा कार्यालयात चकरा माराव्या न लागता ते त्यांच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरद्वारे ऑनलाइन पोर्टलला भेट देऊन योजनेसाठी सहजपणे अर्ज करू शकतात, यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.

 

जिल्हा उद्योग कर्ज योजनेचा नेमका काय आहे उद्देश 

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेचा उद्देश देशातील बेरोजगारीची समस्या मुळापासून उखडून टाकणे आणि तसेच बेरोजगार नागरिकांना स्वत:चा रोजगार उभारण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. तसं तुम्हाला माहिती आहेच की, कोरोना महामारीमुळे अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि बेरोजगार झाले आहेत, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत शासनाने जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून नागरिकांना रोजगार निर्मितीसाठी कर्ज दिलं जाणार आहे. स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यानंतर ते इतर नागरिकांनाही रोजगार देऊ शकेल.

 

योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या.

देशातील ज्या नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील. सरकार नागरिकांना व्यवसाय क्षेत्रासाठी 10 लाख रुपयांपर्यंत आणि उत्पादन क्षेत्रासाठी 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे. जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेंतर्गत उपलब्ध होणाऱ्या कर्जाच्या माध्यमातून नागरिकांना हस्तकलेशी संबंधित व्यवसाय घरबसल्या उघडता येणार असून, त्यामुळे ग्रामीण व हस्तकलेशी संबंधित उद्योगांचा विकास होणार आहे. अर्जदार बीपीएल कार्डधारक असावा आणि इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, तरचं तो योजनेत कर्ज घेऊ शकतो. या योजनेंतर्गत महिला, माजी सैनिक आणि अल्पसंख्याकांना सरकारकडून 25% सबसिडी दिली जाते. सरकारने दिलेल्या कर्जाची रक्कम अर्जदाराला 7 वर्षांच्या कालावधीत परत करावी लागेल.अर्जदाराचे रजिस्ट्रेशन झाल्यावरच ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अर्जदार त्यांच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरद्वारे ऑनलाइन पोर्टलला भेट देऊन योजनेसाठी सहजपणे अर्ज करू शकतात. जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा व्यवसाय उद्योग मंडळ, हातमाग, हॅन्डलूम , ​​ग्रामोद्योग मंडळ, रेशीम आणि कॉयर इंडस्ट्रीज अंतर्गत आला पाहिजे.

उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी पात्रता जाणून घ्या…

 • अर्जदाराकडे स्वतःचे बीपीएल कार्ड असणे बंधनकारक आहे.
 • अर्ज करताना, अर्जदाराकडे सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे.
 • 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले नागरिक या योजनेचा अर्ज भरू शकतात.
 • अर्जदार किमान 8वी पास असावा.

 

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना 2022 साठी आवश्यक कागदपत्रे :-

 • आधार कार्ड
 • पासपोर्ट साइज फोटो
 • रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक
 • मतदार ओळखपत्र
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • पॅन कार्ड
 • प्रकल्प अहवाल (Project report)
 • मूळ पत्ता पुरावा
 • बँक खाते क्रमांक आणि पासबुक
 • वयाचा पुरावा

 

जिल्हा उद्योग केंद्र कर्जासाठी अर्ज कसा करावा ?

अर्जदाराला प्रथम उद्योग आधार udyogaadhaar.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर वेबसाइटचे होम पेज ओपन होईल. होम पेजवर, तुम्हाला एंटरप्राइझ नोंदणी (Enterprise registration) वर जाऊन नव्या उद्योजकांनी ‘For New Entrepreneurs Who Are Not Register Yet As MSME’ ऑप्शनवर क्लिक ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यावर तुमच्या समोर पुन्हा एक नवीन पेज उघडेल. नवीन पेजवर तुम्हाला तुमचा https://udyamregistration.gov.in/UdyamRegistration.aspx आधार क्रमांक आणि उद्योजकाचं नाव भरावे लागेल.

 

त्यानंतर तुम्हाला ‘Validate and generate OTP’ या ऑपशवनर क्लिक करावं लागेल.

क्लिक केल्यावर, तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईलवर OTP मिळेल जो तुम्हाला दिलेल्या बॉक्समध्ये भरायचा आहे.

आणि validate वर क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर, अर्जाचा फॉर्म आपल्यासमोर नवीन पेजवर उघडेल.

अर्जामध्ये विचारलेली माहिती भरावी लागेल.

सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

क्लिक केल्यावर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पावती क्रमांकासह पावती मिळेल.

तुम्ही त्याची प्रिंट काढून ठेवू शकता.

अशा प्रकारे तुमची कर्ज अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल…

 

ऑफलाईन फॉर्म कसा भराल :-

तुम्ही जिल्हा उद्योग केंद्र, कडी ग्रामोद्योग, ग्रामोद्योग मंडळ कार्यालयात ऑफलाइन माध्यमातून योजनेचा फॉर्म भरून शकता.

 

या कर्जाच्या माध्यमातून तुम्ही कोणकोणते व्यवसाय सुरु करू शकता ?

 

फळे, टॉफी, तंबू, फर्निचर, पार्लर, हेअरपिन, स्केच, पेन निर्मिती, बॉटल पॅकिंग सॉस, सोयाबीन, डेअरी, प्रिंटिंग मशीन, आइस्क्रीम, आइस कँडी, ऑइल मिल, पिठाची गिरणी, मसाले, सायकल दुरुस्ती, चहाचे दुकान, न्हावी, अँल्युमिनियम भांड्यांचे दुकान, मोबाईल शॉप, कीटकनाशक दुकान, बॅटरी भरण्याचे उद्योग इत्यादी. सुरू करण्यासाठी कर्ज घेऊ शकता.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.