नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
(अमळनेर प्रतिनिधी :- नूर खान) थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली..भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे थोर स्वातंत्र्य सैनाणी यांच्या शहरातील मध्यवर्ती व रहदारीच्या सुभाष चौकातील पुतळा हा दुर्लक्षित असल्याचे लक्षात येताच “जेथे कमी तेथे आम्ही” या ग्रुप च्या सदस्यांनी तात्काळ सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची साफसफाई करून नेताजींच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण केले व अमर रहे अमर रहे नेताजी अमर रहे या जयघोषाने चौक दुमदुमून गेला. यावेळी थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला व “तुम मुझे खून दो ! मैं तुम्हे आजादी दूंगा !या त्यांच्या घोषनेने इतिहासातील ज्वलंत प्रसंगांना उजाळा मिळाला.
या प्रसंगी ग्रुप चे सदस्य माजी सैनिक राजेंद्र यादव, पत्रकार सचिन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सौरव सोनवणे, गोटू रणदिवे, स्वप्निल जाधव, भीमराव पवार, विनोद देसाई, योगेश मिस्तरी विक्की, महाजन आदी उपस्थित होते…