DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पालकमंत्री नसल्याने स्वातंत्र्यदिनी कोणता मंत्री कुठे ध्वजारोहण करणार, यादी जाहीर !

मुंबई :  एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. मात्र अद्याप खातेवाटप झाले नाही तसेच पालकमंत्री नेमले नाहीत. त्यामुळे जिल्हास्तरावरील यंत्रणांना पालक नाही. स्वतंत्र्यदिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमुख शासकीय कार्याक्रमात ध्वजारोहण केले जाते. परंतु अद्याप मंत्र्यांना जिल्ह्यांचे वाटप केले नसल्याने 15 ऑगस्टला कोणता मंत्री कोठे ध्वजारोहण करणार याची उत्सुकता होती. मुख्यमंत्र्यांसह 20 मंत्री असल्याने इतर 16 जिल्ह्यात विभागीय आयुक्त अथवा संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  यांच्यावर ध्वजारोहण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

बहुतांश नेत्यांना त्यांचेच जिल्हे देण्यात आले आहेत. आता जे मंत्री ध्वजारोहणासाठी येतील तेच जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार का याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये सर्वाधिक उत्सुकता पुण्याची होती. कारण पुण्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे जबाबदारी घेणार असल्याची चर्चा होती. तसे चंद्रकांत पाटील यांनी संकेत देखील दिले होते. मात्र, प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस हे नागपूर आणि चंद्रकांत पाटील हे पुण्यात ध्वजारोहण करणार आहेत.

कोणता नेता कोठे ध्वजारोहण करणार

१. गुलाबराव पाटील  – जळगाव

२ . देवेंद्र फडणवीस – नागपूर

3. चंद्रकांत पाटील – पुणे

4. राधाकृष्ण विखे-पाटील  – अहमदनगर

5. गिरीश महाजन  – नाशिक

6. दादा भुसे  – धुळे

7. सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर

8. रवींद्र चव्हाण – ठाणे

9. मंगलप्रभात लोढा  – मुंबई उपनगर

10. दीपक केसरकर  – सिंधुदुर्ग

11. उदय सामंत  – रत्नागिरी

12. अतुल सावे – परभणी

13. संदीपान भुमरे – औरंगाबाद

14. सुरेश खाडे  – सांगली

15. विजयकुमार गावित  – नंदुरबार

16. तानाजी सावंत – उस्मानाबाद

17. शंभूराज देसाई  – सातारा

18. अब्दुल सत्तार – जालना

19. संजय राठोड  – यवतमाळ

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.