DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार

नाशिक:

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून भोंदूबाबाने २७ वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गंगापूरगाव परिसरात घडली. पोलिसांनी भोंदूबाबासह दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात भोंदूबाबासह दोघांविरुद्ध बलात्कार, विनयभंग, महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोंदूबाबा कामिल गुलाम यासीन शेख (२९, रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. गंगापूर गाव), स्टॅलीस्टींग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नांडिस (५८, रा. आंध्रप्रदेश, सध्या रा. कामठवाडा, नाशिक), अशोक नामदेव भुजबळ (६३, रा. राधाकृष्णनगर, सातपूर, नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, गंगापूरगावातील पठाडे गल्ली येथील जामा मस्जिदजवळील पत्र्याच्या घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून कामिल शेख याने महिलेवर बलात्कार केला. डिसेंबर २०२० मध्ये कामिल याच्यासह पीडितेच्या पतीचे ओळखीचे स्टॅलीस्टींग फर्नांडिस व अशोक भुजबळ यांनी पीडित महिलेस पैशांचा पाऊस पाडू, असे आश्वासन दिले. त्यासाठी पूजा करावी लागेल, असे भोंदूबाबाने सांगून डिसेंबर २०२० मध्ये पीडित महिलेस तीन आठवडे दर बुधवारी येण्यास भाग पाडले. त्यानंतर पूजा मांडून भोंदूबाबा कामिल याने पीडितेवर पुजा करण्याच्या बहाण्याने तीनवेळा बलात्कार केला. स्टॅलिस्टींग फर्नांडिस व अशोक भुजबळ यांनी महिलेस प्रवृत्त केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पैशांचा पाऊस पडेल, असे आश्वासन देत पीडितेस सात महिने आशेवर ठेवले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.