पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण
जळगाव | प्रतिनिधी
जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात आज गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या सहकार्यातुन 130 च्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये निंब, करंज, बदाम, पेलेटोफार्म, बकूळ, बुच, चांदणी, चाफा, कन्हेर, जास्वंद यांचा समावेश आहे. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, होम डीवायएसपी विठ्ठल ससे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, राखीव पोलीस निरीक्षक श्री. सोनवणे, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोनि बळिराम हिरे, शहर पोलीस स्टेशनचे पोनि विजयसिंह ठाकूरवाड, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोनि प्रताप शिकारे, जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोनि रामदास वाकडे, जिल्हा विशेष शाखेचे पोनि. श्री. ठोंबे, जैन इरिगेशनचे अनिल जोशी, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, विजयकुमार वाणी, संदीप मांडोळे, बाळू पाटील, जैन स्पोर्टस ॲकडमीचे अरविंद देशपांडे, रविद्र धर्माधिकारी उपस्थित होते. पोलीस अधिक्षक कार्यालयातील माळी हरिषचंद्र पाटील, जैन इरिगेशन गार्डन विभागातील मंगलसिंग राठोड, रविंद्र सपकाळे, नारायण बारसे यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.