DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

फक्त ९ रुपयात करा विमान प्रवास; बुकिंग सुरू…

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क | जर तुम्ही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आहे. जिथे तुम्ही फक्त 9 रुपयात हवाई प्रवास करू शकता. तोही आंतरराष्ट्रीय प्रवास तुम्ही केवळ ९ रुपयात करू शकता. जाणून घेऊ या ऑफर बद्दल अधिक माहिती आंतरराष्‍ट्रीय विमान कंपनी Vietjet ने ९ रुपयांत हवाई तिकिटांची ऑफर आणली आहे. त्यासाठीचे बुकिंग ४ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. ही ऑफर २६ ऑगस्टपर्यंत वैध आहे. म्हणजेच, जर तुम्ही बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी ४ ते २६ ऑगस्ट दरम्यान तिकीट बुक केले तर तुम्हाला ही संधी मिळू शकते.

विमान कंपनी VietJet ने दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, VietJet भारत ते व्हिएतनाम प्रवासासाठी ३०,००० प्रमोशनल तिकिटे देत आहे. या तिकिटांच्या किमती रु.९ पासून सुरू होतात. १५ ऑगस्ट २०२२ ते २६ मार्च २०२३ पर्यंतच्या प्रवासासाठी ४ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत बुकिंग करता येईल.

 

एअरलाइन कंपनीच्या म्हणण्यानुसार, ४ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तिकीट बुक करताना तुम्हाला प्रमोशनल तिकिट मिळू शकतात. एअरलाइन कंपनी व्हिएतजेटचे व्यावसायिक संचालक जय एल लिंगेश्वर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले, व्हिएतजेट भारत आणि व्हिएतनाम दरम्यान १७ मार्गांसाठी थेट उड्डाणे चालवेल. भारतीय प्रवासी आता थेट दा नांग या सुंदर शहराला, तसेच होई एन, ह्यू इम्पीरियल, माय सोन अभयारण्य आणि जगातील सर्वात मोठी गुहा सोन डूंग यासह जवळपासच्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी डायरेक्ट फ्लाइट घेऊ शकतात.

दरम्यान, व्हिएतनामचे राजदूत फाम सॅन चाऊ म्हणाले की, व्हिएतनाम हे भारतीय पर्यटकांमध्ये एक मजबूत पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे. व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, यापुढे दूतावासात जाण्याची गरज नाही. सध्या व्हिएतनामला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज येत आहेत. कोविडनंतर व्हिसाची सरासरी संख्या २४ पटीने वाढून ६,००० व्हिसावर पोहोचली आहे, जी पूर्वी २५० होती.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.