बाबो! हॉटेलमध्ये गेल्यावर तंदुरी रोटी खात असाल तर आधी थांबा कारण…
मुंबई। रोजच्या घरातील जेवणामुळे कंटाळा आल्यावर बरेचसे लोक महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा हॉटेलमध्ये जेवायला जात असतात. किंवा कधीकधी आपल्या कुटुंबातील सदस्याचा किंवा आपल्या मित्र मैत्रिणीचा वाढदिवस असेल तर मग आपण सर्व मिळून हॉटेलमध्ये जेवायला जात असतो.
हॉटेलमध्ये गेल्यावर निरनिराळ्या जेवणाची लिस्ट हॉटेल मधील काम करणारे कर्मचारी आपल्या समोर ठेवत असतात. व त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार जेवण ऑर्डर करत असतो. मात्र जेवण काहीही मागवलं तरी बरेच लोक रोटी खाण्यास प्रथम प्राधान्य देतात.
काहीजण चपाती, साधी रोटी ऑर्डर करतात. तर काहीजण बटर किंवा तंदुरी रोटी ऑर्डर करतात. मात्र आपण जे काही खातो किंवा पितो त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. जरी आपल्याला हे चमचमीत पदार्थ तात्पुरता खावेसे वाटले तरी त्यानंतर बऱ्याच लोकांना कोणते ना कोणते आजार उद्भवत असतात.
अशातच आपण हॉटेलमध्ये जी तंदुरी रोडी मागवत असतो त्याच्या अतिसेवनाने आपल्या शरीरावर जास्त प्रमाणात परिणाम होत असतो. या तर जाणून घेऊयात तंदुरी रोटीचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम. तंदूरी रोट्या मैद्यापासून बनवल्या जातात, सतत मैद्याच्या सेवनाने अनेक रोग होतात.
तंदुरी रोटीमध्ये 110 ते 150 कॅलरीज असतात. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते. त्यात खूप उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आहे, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. तसेच तंदुरी रोटीत मैद्याचं प्रमाण अतिप्रमाणात असल्याने तंदुरी रोटीमध्ये मैद्याच्या अस्तित्वामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. जर तुम्हाला तंदुरी रोटी खायची असेल तर तुम्ही गव्हापासून बनवलेली तंदुरी रोटी खावी. त्यामुळे जर तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला जायचं असेल तर शक्यतो तंदूर रोटी खाणं शक्यतो टाळा, जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त व आजारापासून दूर राहाल.