DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भुसावळ शहरात ४७ लाखांचा गुटखा पकडला ; एकाला अटक

भुसावळ ;- शहरातील जामनेर रोडवर तब्बल 47 लाखांचा गुटखा अवैधरित्या घेऊन जाणार ट्रक भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी २० ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पकडला असून कंटेनरसह एकूण ५६ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . याप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत पोलीस सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, २०/०८/२०२३ रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास पिमीवर हॉटेल समोर, जामनेर रोड या मार्गाने आरोपी जगदिश मांगीलाल श्रीवास्तव वय ४८ वर्ष, रा ७९०, कुंदन नगर, हवा बंगला, केट रोड, इंदौर, मध्यप्रदेश हा त्याचेकडील टाटा कंपनीचे कंटेनर क्र युपी ७८. सी. एन. ५६९८ मधे महाराष्टात गुटखाजन्य पदार्थावर बंदी असताने देखील वर नमुद गुटखाजन्य पदार्थची वाहतुक करताना मिळून आला .

राखाडी विटकारी रंगाच्या मोठया गोण्या, प्रत्येक येथे गोणी मध्ये दोन सफेद रंगाच्या गोण्या व त्या प्रत्येक गोणीत०४ लहान आकाराच्या सफेद रंगाच्या पिशव्या दिसत असुन, त्यातील प्रत्येक सफेद रंगाच पिशवीत २६ प्रिमीयम राजनिवास, सुगान्धिप्रिमीयम राजनिवास, सुगान्धित पान मसाला असा मजकुर लिहलेले पाकीटे प्रत्येकी किंमत १९२ रूपये.प्रमाणे ३७,९३,९२०, १८ गुलाबी रंगाच्या गोण्या, प्रत्येक गोणीत लहान ०५गोण्या, त्यातील

प्रत्येक लहान ०८ सफेद रंगाच्यापिशव्या, त्यातील प्रत्येक सफेद रंगाचे पिशवी २६ प्रिमावर सुगंधी पानमसाला.०१ T असा मजकुर लिहलेले पाकीट प्रत्येकी किंमत ४८ रूपय ८.९ ८,५६०/-रु एक टाटा कंपनीचा मोठा बंदिस्त कंटेनर ज्याचा क्र (UP – SCCN५६ ९८ ) असलेला १० लाख रुपये किमतीचा असा एकूण ५६.लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

यांनी केली कारवाई
बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव
बाजारपेठ पोलीस स्टेशनचया गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोहेकॉ सुनील जोशी, पोहेकॉ/ उमाकांत पाटील, पोहेकॉ / निलेश चौधरी, पोहेकॉ रमन सुरडकर, पोहेकॉ यासीन पिंजारी, पोकॉ प्रशांत पेरदेशी, पोकॉ योगेश माळी, पोकॉ/ प्रशांत सोनार आदींनी कारवाई केली.

चालक आरोपी जगदिश मांगीलाल श्रीवास्तव याचे विरुद्ध भा.द.वि कलम २७२,२७३,३२८ सह अन्न सुरक्षा मानद अधिनिअम २००६ चे कलम -९२३(१)(22)(1), ३(१)(zz) (v), २६ (२)(i). २६ (२)(v) २७३ () सह वाचन नियम २.३.४ अन्न सुरक्षा मानद अधिनियम २०११ चे कलम ५९(i) प्रमाणे फिर्याद दिल्यावरून २१ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.