DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मुंबई हायकोर्टाने राणा दांपत्याची याचिका फेटाळली,पण…

मुंबई : मुंबई हायकोर्टाने राणा दाम्पत्याने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे. मात्र यात जर दुसऱ्या एफ आय आर मध्ये कोणतीही कारवाई करावयाची असल्यास ७२ तास आधी कळवणे गरजेचे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला काही अंशी दिलासा मिळालाय, असे म्हणता येईल.

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुंबई पोलिसांनी आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावेळी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार सुनावणी सुरु असून यावेळी कोर्टाने राणा दांपत्याला सुनावलं आहे.

 

राणा दाम्पत्यावर 124 अ आणि 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन वेगवेगळे एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. घटना एकच असताना दोन वेगवेगळे एफआयर दाखल करण्याची गरज काय असा सवाल करत एकाच एफआरआयमध्ये सर्व गुन्हे दाखल करा अशी मागणी करत राणा दाम्पत्यांने केली होती. मात्र ही याचिका फेटाळत राणा दाम्पत्याला न्यायालयाने धक्का दिला असून दोन घटना या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करणे आवश्यक आहेत असा निकाल दिला आहे. मात्र दुसऱ्या एफआयआरमध्ये कारवाईपूर्वी आरोपींना 72 तास आधी नोटीस देणं आवश्यक असल्याचंही सांगितलं आहे.

हा गुन्हा जाणूनबूजून दाखल करण्यात आल्याचा आरोप राणांच्या वतीनं करण्यात आला. जर पहिल्या एफआयआरमध्ये जामीन मिळाला तरी दुसऱ्या एफआयआरमध्ये आम्हाला पुन्हा अटक करता यावी यासाठीच हा गुन्हा दाखल झालाय. घटना एकच असताना दोन वेगळ्या एफआयआर दाखल करणं चुकीचं आहे असा युक्तीवाद राणा दाम्पत्याच्या वतीनं करण्यात आला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष सरकारी वकिलांच्या दाव्यात तथ्य दिसतंय असं न्यायालयाने म्हटलं. जर दोन्ही याचिकाकर्ता कायद्याचा आदर करणारे लोकप्रतिनीधी असतील तर त्यांनी पोलिसांना विरोध करायला नको होता असंही न्यायालयाने म्हटलं.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.