DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

येत्या १ ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम; तुमच्यावर होणार असा परिणाम?

मुंबई : वृत्तसंस्था
जुलै महिना संपत आला आहे. अवघ्या चार दिवसांनी ऑगस्ट महिना सुरू होईल. येत्या १ ऑगस्टपासून अनेक महत्त्वाच्या बाबींविषयी नियम बदलले जाणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमत नव्याने ठरवण्यात येणार आहे. तसेच बँका व्यवहाराच्या नियमांत काही बदल करण्याची शक्यता आहे. या बदलांचा जनसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे.

१ ऑगस्टपासून वेगवेगळे नियम बदलण्यात येतील. दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती गॅसच्या किंमती ठरवण्यात येतात. ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेपासून हे भाव कमी जास्त होऊ शकतात. सरकारी तेल उत्पादक कंपन्या गॅस सिलिंडरच्या किंमती ठरवतात. गेल्यावेळेप्रमाणेच यावेळी सुद्धा गॅसच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

तसेच बँक ऑफ बडोद्याचे धनादेशाचे नियम १ तारखेपासून बदलले जातील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन बँक करणार आहे. बँक ऑफ बडोद्याने त्याअनुषंगाने धनादेश व्यवहारांचा नियम बदलणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेपासून पाच लाख रुपयांच्या वरील आर्थिक व्यवहारांसाठी बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू केली आहे. धनादेश देणाऱ्याला बँक आता धनादेश व्यवहाराची विषयीची अद्ययावत माहिती एसएमएस, नेटबँकिंग, मोबाईल अॅपद्वारे देईल. त्यामुळे धनादेश व्यवहाराच्या फसवणुकीचे प्रकार होणार नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेतील फसवणूक टाळण्यासाठी ही पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू केली आहे. फसवणूक रोखण्यासाठी २०२० पासून धनादेशासाठी केंद्रीय बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टिम सुरु केली आहे. या सिस्टिममुळे ५०,००० आणि त्यावरील अधिकच्या पेमेंटसाठी नुकसान टाळण्यास येणार आहे. सिस्टिमनुसार, SMS, बँकेचे मोबाईल अॅप वा एटीएमद्वारे धनादेश देणाऱ्या व्यक्तीला धनादेशाविषयीची माहिती बँकेला द्यावी लागणार आहे. धनादेशाविषयी ही माहिती तपासली जाते. सर्व माहिती योग्य वाटल्यावरच धनादेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करता येते.

ऑगस्ट महिन्यात एकूण १८ दिवस बँकांना सुट्टी राहणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट महिन्यातील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्यात मोहरम रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, कृष्ण जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी असे महत्वाचे सण आहेत. यादिवशी बँकेचे कामकाज बंद असेल. याशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने बँकांचे शटर डाऊन असेल. सगळ्या प्रकारच्या सुट्यांचा विचार करता, ऑगस्ट महिन्यांत बँकांना एकूण १८ दिवस सुट्टी असेल.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.