DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राज ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी


जळगाव:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे 2022 रोजी औरंगाबाद येथील जाहिर सभेचे लाईव्ह टेलिकास्ट सुरू असल्याने आम्ही न्युज चॅनेल वर हि संपुर्ण सभा पाहिली व ऐकली . सदर सभेत राज ठाकरे यांनी चिथावणीखोर , दोन समाजात तेढ निर्माण करणारे व समाज विध्वंसक होऊन राज्यभरात अशांतता निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडेल असे वक्तव्य करत असामाजिक कृत्य केलेले आहे . तसेच त्यांनी महापुरुषांच्या इतिहासाबद्दल चुकीची माहिती पसरवुन जनतेची दिशाभूल केलेली आहे . यासर्व प्रकारांमुळे आमच्या व सर्व जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत . त्यामुळे त्यांचे संपूर्ण भाषण ऐकून त्यांच्यावर भारतीय संविधानात तरतूद असल्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात यावी . अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांना निवेदन देऊन करण्यात आली . याप्रसंगी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटिल , सुनील माळी , राजू मोरे , सुशील शिंदे , अमोल कोल्हे , डॉ. रिजवान खाटिक , किरण राजपूत , रमेश बाहरे , अकिल पटेल , राहुल टोके , नईम खाटिक , जितू बागरे , ईब्राहीम तडवी , किरण चव्हाण आदि उपस्थित होते .

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.