रावेर पंचायत समिती शौचालय घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू !
रावेर : प्रतिनिधी
येथिल पंचायत समितीतीतील बहुचर्चित वयक्तिक शौचालय घोटाळ्यातील योजनेची चौकशी विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून आज गुरुवार पासून सुरू करण्यात आली असून चौकशी पूर्ण झाल्यावर चौकशी अहवाल सादर करण्यात येणार आहे.
तालुक्यासह जिल्ह्यात बहुचर्चित अश्या रावेर पंचायत समितीच्या वैयक्तिक शौचालय अनुदानात भ्रष्टाचार झाल्याने घोटाळ्या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल असून काही जण अटकेत आहेत याप्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रधान सचिवकडे तक्रार केली होती. याची दखल घेवून या प्रकरणाची चौकशी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समितीत मार्फत करण्यात येत असून चौकशी करून त्वरित अहवाल देण्याचा आदेश विभागीय आयुक्ताना देण्यात आले आहेत.
यानुसार चौकशी समितीतील अधिकाऱ्यांनी आज दिवसभर वैयक्तिक शौचालय योजना व पंचायत समितीने राबविलेल्या विवीध योजनाची चौकशी सुरु केली आहे. सदरील चौकशीची तालुक्यात बरीच चर्चा होत आहे.