DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस, जप्त केलेली संपत्ती …

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना आज पुन्हा ईडीने नोटीस पाठवली आहे. जमीन घोटाळा प्रकरणात जप्त केलेली मालमत्ता दहा दिवसांत रिकामी करण्याचे निर्देश दिले आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करत मालमत्ता खाली केल्या जातील असे नोटिसीत नमूद केले आहे. दरम्यान, खडसेंसह आणखी चार जणांना याबाबतच्या नोटीस पाठवल्या आहेत.
जमीन घोटाळा प्रकरणात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीने खडसेंची 5 कोटी 75 लाख रुपये किमतीची संपत्ती जप्त केली होती. यात लोणावळय़ातील बंगला, जळगावमधील 3 फ्लॅट आणि 3 मोकळय़ा भूखंडांचा समावेश आहे. ही मालमत्ता 10 दिवसांमध्ये रिकामी करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. तसे नाही केल्यास कायदेशीररीत्या या मालमत्ता रिकाम्या केल्या जातील असे नोटिशीत म्हटले आहे. तसेच संबंधित मालमत्ता विक्री किंवा हस्तांतरण करण्याची परवानगी देऊ नये, असे नोंदणी महानिरीक्षक, संबंधित जिल्हाधिकाऱयांना कळवले आहे. खडसे यांनी महसूलमंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करत भोसरी येथील 3.1 एकर एमआयडीसीचा भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.