DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रूमालाने गळफास घेवून २५ वर्षीय युवकाची आत्महत्या

जळगाव । प्रतिनिधी 

सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढतानाचे दिसून येतेय. अशातच एका २५ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कुसुंबा येथे उघडकीस आलीय.धनंजय चंद्रजित बाविस्कर (वय-२५)असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कुसुंबा येथे नोकरीनिमित्त राहणार धनंजय बाविस्कर हा एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरीला आहे. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने पत्नी उज्ज्वला माहेरी गेली असल्याने धनंजय हा घरी एकटाच होता. काल मध्यरात्री धनंजयने रूमालाने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी ११ वाजले तरी धनंजय उठला नाही अशी शंका शेजारी राहणाऱ्यांना आली. शुभांगी ह्या घरी आल्यावर भावाने गळफास घेतल्याचे लक्षात आले.

त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महेंद्र गायकवाड, नरसिंग पाडवी हे करीत आहे. शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मयताच्या पश्चात पत्नी उज्वला, आई, वडील व बहिण असा परिवार आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.