DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

विकी आणि कतरिना कैफने गुपचूप उरकला साखरपुडा?

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते बी-टाउनमधील सध्याचे चर्चेतील कपल आहेत. अनेकदा दोघेही एकत्र फिरताना दिसतात. पण त्या दोघांनीही कधीही उघटपणे त्यांच्या नात्यावर वक्तव्य केलेले नाही. आता विकी आणि कतरिनाचा साखरपुडा झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर कतरिना आणि विकीने गुपचूक साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगल्या असल्याचे सांगितले आहे. ‘विकी आणि कतरिनाचा साखरपुडा झाला असून रोकादेखील झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही’ या आशयाचे ट्वीट विरलने केले आहे. सध्या त्याचे हे ट्वीट चर्चेत आहे.

या ट्वीटवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एका यूजरने ‘ही बातमी खरी असू दे’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘आता आम्ही त्यांच्या लग्नाची वाट पाहात आहोत’ असे म्हटले आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या अफेअरची चर्चा २०१८ पासून सुरू झाली. करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये कतरिनाला विचारले होते की, तिच्याबाजूला कोणता अभिनेता शोभेल ? यावर उत्तर देताना कतरिनाने विकी कौशलचे नाव घेतले होते. त्यानंतर याच चॅट शोमध्ये जेव्हा विकी कौशल आला होता, त्यावेळी कतरिनाने दिलेल्या उत्तराबाबत त्याला सांगितले. कतरिनाने दिलेले उत्तर ऐकून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.