DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

व्हाट्सॲपवर फक्त 30 सेकंदात मिळणार कर्ज, कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही; जाणून घ्या पुर्ण प्रक्रीया

लिडिंग क्रेडिट फर्म CASHe द्वारे एक विशेष क्रेडिट सुविधा सुरू केली आहे. हे फीचर खासकरून WhatsApp बिझनेस वापरकर्त्यांसाठी आहे. या सुविधेअंतर्गत, व्हॉट्सअॅप बिझनेस प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना अवघ्या 30 सेकंदात कर्ज मिळू शकणार आहे.(get-a-loan-in-just-30-seconds-on-whatsapp-no-paperwork-required)
यासाठी वापरकर्त्यांना कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही किंवा त्यांना कोणताही अर्ज भरावा लागणार नाही. याशिवाय कोणत्याही प्रकारचे अॅप डाउनलोड न करता 30 सेकंदात कर्ज मिळू शकते.
प्रश्न असा पडतो की, व्हॉट्सअॅपवरून झटपट कर्ज मिळवण्यासाठी काय करावे लागेल? तर CASHe च्‍या सहकार्याने ऑफर करण्‍यात येणा-या झटपट कर्जाच्या सुविधेसाठी वापरकर्त्यांना WhatsApp चॅट बॉक्सवर एक साधा HI संदेश टाईप करावा लागेल.
यानंतर ते +91 80975 53191 वर पाठवावे लागेल. हा मेसेज पाठवल्यानंतर व्हॉट्सअॅप बिझनेस(WhatsApp Business) वापरकर्त्यांना पूर्व-मंजूर कर्ज मिळेल.
ही एक इंडस्ट्री लीडिंगची(Industry Leading) पहिली क्रेडिट लाइन सुविधा आहे. जे AI-पॉवर्ड आहे. हे वापरकर्त्यांना त्वरित आणि कोणत्याही अडचणीशिवाय कर्ज मिळविण्यात मदत करेल. भारतात व्हॉट्सअॅपचे लाखो वापरकर्ते आहेत. ज्याला CASHe च्या मदतीने प्री-अप्रूव्ड लोनची सुविधा दिली जाईल.
या सुविधेचा 24/7 आनंद घेता येईल. कोणतेही व्हॉट्सअॅप वापरकर्ते ही सेवा घेऊ शकतात. वापरकर्ते सिंगल WhatsApp क्रमांक +91 80975 53191 वर HI संदेश पाठवून कर्ज घेऊ शकतील. हा एक संपर्करहित मोड आहे जिथून त्वरित क्रेडिट मिळू शकते. मात्र, केवळ पगारदार ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
या सुविधेअंतर्गत, KYC तपासणी आणि पडताळणीची प्रक्रिया एआय-पावर्ड मोडद्वारे पूर्ण केली जाईल. यानंतर तुमची क्रेडिट लाइन ठरवली जाईल. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाईल याची माहिती दिली जाईल. तुम्ही दिलेल्या काही माहितीच्या आधारे क्रेडिट लाइन निश्चित केली जाईल.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.