DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

श्री. गो. से. हायस्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात संपन्न

पाचोरा ;- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से‌. हायस्कूल, पाचोरा या विद्यालयात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी या दोन महान विभूतींच्या प्रतिमेस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उप मुख्याध्यापक एन. आर. पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक आर. एल. पाटील, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी, आर. बी. बोरसे, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. जयंती दिनाचे औचित्य साधून शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला व तंबाखूमुक्ती ची शपथ घेण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी, तसेच बी. एस. पाटील, आर. बी. तडवी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उज्वल पाटील तर उपस्थितांचे आभार मयूर देवरे यांनी मानले.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.