DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

संजय राऊतांच्या कथित ऑडिओ क्लिपची सरकारने घेतली दखल, पोलिसांना दिले आदेश?

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत एका ऑडिओ क्लिपमुळे वादात सापडले आहे. त्यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या व्हायरल क्लिपची शिंदे सरकारने दखल घेतली आहे.

पोलीस विभागाने या घटनेची गंभीरतेने दखल घेण्याचे राज्य सरकारचे आदेश दिले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. दोन दिवसांपासून संजय राऊत यांनी एका महिलेला अश्लिल भाषेत बोलत असल्याचे दिसून आले आहे. या ऑडिओ क्लिपची अद्याप कुणीही पुष्टी केली नाही.

मात्र, आता संजय राऊत प्रथमच आता राज्य सरकारच्या निशाण्यावर आले आहे. समाज माध्यमांमध्ये फिरत असलेल्या ऑडिओ फितीची राज्य सरकारकडून गंभीर दखल, घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 70 सेकंदाची ऑडिओ क्लिप आहे. काही वृत्तवाहिन्यांवर आणि समाजमाध्यमांमध्ये क्लिप दाखवण्यात आली आहे.

संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्यातील हा संवाद असल्याचा दावा करण्यात आला आहे.  पोलीस विभागाने या घटनेची गंभीरतेने दखल घेण्याचे राज्य सरकारचे आदेश दिले आहे, महिलेची तक्रार दाखल झाली असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहे. पत्रा चाळ प्रकरणाशी या क्लिपला संदर्भ, स्वप्ना पाटकर यांनी ईडीकडे सुद्धा या धमकीची तक्रार केलेली आहे. ती जमीन आमच्या नावे करा, असे त्यात संजय राऊत सांगत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येत आहे. अतिशय अश्लील आणि आपत्तीजनक संवाद या क्लिपमध्ये आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.