DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सख्ख्या लहान भावाच्या विधवेवर वाईट नजर, मुलाला मारुन टाकण्याची धमकी देत अत्याचार

 

 

 

अमळनेर : प्रतिनिधी 

येथील अत्याचाराची एक खळबळजनक घटना समोर आलीय. मोठ्या दिराने सख्ख्या लहान भावाच्या विधवा पत्नीवर मुलाला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या अत्याचारातून पीडिता गरोदर राहिली असून तिच्या तक्रारीनुसार सासू, सासरे, दीर आणि जाऊविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मोठ्या दिराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हेहि वाचा…

पालकमंत्री नसल्याने स्वातंत्र्यदिनी कोणता मंत्री कुठे ध्वजारोहण करणार, यादी जाहीर !
‘हर घर तिरंगा’ उपक्रमात जैन उद्योग समूहातर्फे 8000 सहकाऱ्यांना राष्ट्रध्वज वितरित होणार

या संदर्भात पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, साधारण सहा-सात महिन्यांपूर्वी ती सासरी असतांना मोठ्या दिराने पीडितेला मुलाला मारुन टाकेल अशी धमकी देत इच्छेविरुध्द पीडितेसोबत शारिरीक संबध प्रस्थापित केले. यामुळे त्याच्यापासून पीडिता गरोदर राहिली. त्यानंतर एवढेच नाहीतर सासू, सासरे जाऊ यांनी पीडितेच्या पोटावर हाता-बुक्यांनी मारहाण केली. तसेच, शिवीगाळ करत तिचा छळ केला.

दरम्यान, पीडितेला आधार नसल्यामुळे तिला जळगावच्या आशादीप महिला संरक्षण केंद्रात ठेवण्यात आले. तर संशयित दीर गोपाल भोई याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.