DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

समाजकंटकांचा थैमान, भडगाव तालुक्यात 2 एकर कपाशी उपटून टाकली, शेतकरी महिलेचा टाहो (व्हिडिओ)

भडगाव । प्रतिनिधी

आधीच दुबार पेरणी, ओला दुष्काळसह कोरोना-लॉकडाऊनने कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. त्यातच भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात एका  शेतकऱ्याची तब्बल दीड ते दोन एकर शेतातील कपाशी पीक अज्ञान समाजकंटकांनी उपटून टाकलं. त्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेल्या आपल्या पिकाचं नुकसान पाहून शेतकरी महिलेने टाहो फोडला. या घटनेने कजगाव परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

हे शेतकरी आदिवासी समाजातील असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. मळगाव येथील रहिवासी मीराबाई उत्तम गायकवाड यांच्या आईच्या मालकीचं तांदुळवाडी शिवारातील शेत करतात. दिवसरात्र मेहनत करून देखील त्याला पुरेसा मोबदला मिळत नाही. त्यातच दीड ते दोन एकर जमिनीतील कपाशी पीक उपटून अज्ञान माथेफिरुने नुकसान केलं.  

 घटनास्थळी झालेले नुकसान पाहून मीराबाई गायकवाड यांचा आक्रोश पाहायला मिळाला. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांचे हे ओक्साबोक्सी रडणे पाहून उपस्थित ग्रामस्थही भावूक झाल्याचे दिसून आले. घटनास्थळी सरपंच गुलाब पाटील पोलीस पाटील रेश्मा मरसाळे, तंटामुक्ती अध्यक्ष जयंत पाटील, दीपक पाटील, दादाभाऊ पाटील, स्वप्नील पाटील, प्रताप परदेशी, रतन बैरागी यांच्यासह मळगाव तांदुळवाडी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. नुकसानग्रस्त शेतकरी सचिन गायकवाड स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत.

दरम्यान, घडलेल्या या दुर्दैवी घटनेचे सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त केला जात आहे. एखाद्या शेतकऱ्याचे एवढे मोठे नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.