चाळीसगाव तालुक्यातील 14 वर्षीय मुलीला पळविले
चाळीसगाव;– तालुक्यातील एका गावातून एका 14 वर्षे 11 महिन्याच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिल्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की एका गावातील 14 वर्षे मुलगी ही तीन ऑगस्ट 2023 रोजी रात्री नऊ ते चार ऑगस्ट 2023 रोजी सकाळी चार वाजे दरम्यान राहत्या घरून तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिल्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला पुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील करीत आहे.