जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात “ कॉमर्स डे” उत्साहात साजरा
जळगाव;- आशिया खंडात ई-कॉमर्सची बाजारपेठ वेगाने विस्तारत आहे. भारत ई-कॉमर्स क्षेत्रातील अव्वल बाजारपेठ असून, त्यानी चीनला मागे टाकले आहे. भारतात ई-कॉमर्सची बाजारपेठ वर्षामागे ३०० टक्क्यांनी वाढत आहे. कॉमर्स शाखेतील विध्यार्थ्यानी या बाबीचा अंदाज घेत, या क्षेत्रात संशोधन करून आपला ठसा उमठवावा असा सल्ला जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी यांनी दिला,
दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सोमवारी कॉमर्स डे साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवार ता. ८ रोजी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कामगारांच्या व त्यांनी पुरवलेल्या सेवेच्या प्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. कॉमर्स शाखेतून बाहेर पडलेले युवक युवती जगाच्या पाठीवर कुठेही आपले अस्तित्व सिद्ध करू शकतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांच्यात विविध गुण वाढीस लागावेत तसेच कामगारांच्या त्यागाचे स्मरण व्हावे या हेतूने हा दिन साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागातील प्राध्यापकांनी केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी हे होते.
आपल्या मार्गदर्शनात त्या पुढे म्हणाल्या की, बदलत्या आव्हानांचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी झपाट्याने बदलणाऱ्या माहिती तंत्रज्ञान युगात ज्ञान अद्यावत ठेवणे काळाची गरज आहे. यावेळी प्रश्नमंजुषा, वकृत्व स्पर्धा, वादविवाद, निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक साहित्या आणि ईवा सोग्ठी या विध्यार्थ्यानी केले तर प्रा. नेहा लुनिया व प्रा. निकिता वालेचा यांनी आभार मानले तसेच प्रा. संदीप पाटील, प्रा. शितल किनगे, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. राहुल यादव, प्रा. प्रियंका मल, प्रा. मीनाक्षी पाटील, प्रा. नयना चौधरी, प्रा. शिवानी देशमुख, अनिल सोनार व संतोष मिसाळ यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.