DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

का. ऊ. कोल्हे विद्यालयात दहशतवाद्यांशी पोलिसांचा सामना ; मॉक ड्रिलद्वारे पोलिसांचे प्रात्यक्षिक

जळगाव ;- शहरातील का. ऊ. कोल्हे विद्यालयात आज दुपारी तीन दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून त्वरित कारवाई करीत एका दहशत्वाद्याला ठार करून दोन जणांना जिवंत पकडल्याची कारवाई केली. यावेळी गोळीबार झाला . या अचानक झालेल्या चकमकीमुळे विद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र हे पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजताच सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला .

 

आज दुपारी जुन्या जळगावातील का. ऊ. कोल्हे शाळेत दुपारी १२ वाजून १० मिनिटाला तीन दहशतवादी घुसले. त्यांनी थेट आपला मोर्चा मुख्याध्यापिकांच्या दालनाकडे वळविला . यावेळी त्यांनी मुख्याध्यापिका गोसावी मॅडम यांना ओलीस ठेवले . शाळेत दहशतवादी घुसल्याच्या घटनेमुळे शाळेत खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी क्यूआरटी फोर्स सोबत येऊन घटनास्थळ गाठले . यावेळी पोलिसांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले असता त्यांनी प्रत्युत्तरात गोळीबार केल्याने पोलिसांनीही गोळीबार केला. यात एक दहशतवादी मारला गेला. तर दोघांना पोलिसांनी जिवंत पकडले.

दरम्यान हे मॉक ड्रिल असल्याचे सर्वाना समजताच सर्वानी सुटकेचा निःश्वास घेतला . यावेळी परिसरातील नागरिकही पोलिसांचा ताफा पाहून काहीतरी विपरीत घटना घडल्याचे समजून परिसरात गर्दी केली होती. या कारवाईबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांनी हे पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे सांगून याची पूर्वकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका यांना दिली होती. तसेच सध्या कुठे काय होईल याचा नेम नसल्याने एखादा दहशतवादी हल्ला शाळेमध्ये झाल्यास अशा परिस्थितीला विद्यार्थी , शिक्षक नागरिक आणि पोलीस कसे सामोरे जातात , याबाबत हे प्रात्यक्षिक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.