DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास

पाणीपुरी विक्रेत्याची मुलगी कु. रागिणी ९५.२० टक्के गुणांसह अनुभूतीत प्रथम

जळगाव | प्रतिनिधी 

जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वी चा यंदाही 100 टक्के निकाल लागला. यात विद्यार्थीनींनी बाजी मारली. कु.रागिणी मधुकर झांजरे-प्रथम (९५.२० %), चि. पीयुष वासुदेव वाणी- द्वितीय  (९४.२० %) व चि. यश शेखर शिंदे – तृतीय  (९३.२० %), चि. अभिजीत संदीप भंगाळे – चतुर्थ (९२.२०), चि. प्रतीक ज्ञानेश्वर येवले – पाचवा (९१.२०)  उत्तीर्ण झालेत. गुणवत्ताधारक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांनी अभिनंदन केले.  ८९ टक्के विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेत. १० विद्यार्थी ९० टक्केच्या गुणप्राप्त केले. सर्वच विदयार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.

 

“अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत असलेल्या या वि्दयार्थ्यांना आव्हानात्मक परिस्थितीत असली तरी सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत निष्ठेने व सातत्याने आपला अभ्यास केला आणि दैदिप्यमान मिळविले याचे विशेष कौतूक आहे.” अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष व भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी व्यक्त केली.

शाळेत प्रथम आलेली कु. रागीणी हिचे वडील जुन्या बि. जे. मार्केटमध्ये पाणीपुरी विकतात तर आई धुणी-भांडी करते. “आपल्या कन्येने मिळविलेल्या यशामुळे आम्ही सर्व आनंदात आहोत”,  अशी प्रतिक्रिया तिच्या आई-वडिलांनी नोंदविली. स्कूलमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु. पियुषचे वडीलांची आर्थिक परिस्थिती ही बेताची आहे. अशा प्रकारे परिस्थितीशी दोन हात करून अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे  विशेष कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.