DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भारतात ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु होणार !

नवी दिल्ली  :  इंटनेटचा वापर करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. भारतातील 5G ​​सेवा 12 ऑक्टोबरपर्यंत सुरू केल्या जातील आणि किंमती परवडण्याजोग्या असतील असे केंद्रीय माहिती आणि तत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. सरकारने सांगितले की इन्स्टॉलेशन सुरू आहे आणि 5G सेवांच्या रोलआउट करण्यासाठी टेलिकॉम ऑपरेशन्स काम करत आहेत. दरम्यान, 5G सेवा टप्प्याटप्प्याने आणल्या जातील आणि पहिल्या टप्प्यात फक्त 13 निवडक शहरांमध्ये जलद गतीची 5G इंटरनेट सेवा मिळेल.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव याबाबत बोलताना म्हणाले की, “आम्ही 5G सेवा वेगाने सुरू करण्याची योजना आखत आहोत, दूरसंचार ऑपरेटर त्या संदर्भात काम करत आहेत आणि इन्सटॉलेशन केले जात आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरू करू आणि नंतर शहरे आणि शहरांमध्ये आणखी वाढ करू अशी आशा आहे”. दरम्यान 3G आणि 4G प्रमाणेच टेलिकॉम कंपन्या लवकरच डेडिकेटेड 5G टॅरिफ प्लॅन जाहीर करतील. उद्योग तज्ञांच्या मते ग्राहकांना त्यांच्या डिव्हाइसवर 5G सेवां सुरु करण्यासाठी अधिकचे पैसै मोजावे लागू शकतात.

 

केंद्रीय मंत्री आश्वीनी वैष्णव यांनी सांगितले की “5G सेवा देशाच्या प्रत्येक भागात पोहोचणे अपेक्षित आहे आणि त्याचे दर ग्राहकांना परवडण्याजोगे राहतील याची सरकार खात्री करेल. आमची अपेक्षा आहे की येत्या दोन ते तीन वर्षांत 5G सेवा देशाच्या प्रत्येक भागात पोहोचेल आणि ती परवडणारी असेल. टेलिकॉम उद्योग शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागामध्ये ही सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांची सध्या मार्केटवर पकड आहे. या कंपन्या अंतिम वापरकर्त्यांसाठी भरीव किंवा माफक दरवाढीची निवड करायची की नाही याबाबत अंतर्गत विचार करत आहेत. 5G सेवा रोल आऊट झाल्यानंतर स्मार्टफोन निर्मात्यांसोबत आकर्षक डेटा बंडलिंग ऑफर प्रदान करण्यावर चर्चा होईल. देशात 5G सेवा टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल. नपहिल्या टप्प्यात देशातील केवळ निवडक 13 शहरांमध्ये वेगवान 5G इंटरनेट सेवा दिली जाईल.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.