DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव जिल्ह्यातील 6 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

जळगाव : जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जळगाव जिल्हा पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून त्यात एकूण ६ जणांचा समावेश आहे. त्यात दोन अधिकार्‍यांची प्रशासकीय कारणातून तर चार जणांना रिक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. सर्व बदली झालेल्या अधिकार्‍यांनी तातडीने नेमणूक झालेल्या रिक्त जागांवर पदभार स्वीकारावा, असे आदेश देण्यात आलेले आहेत.

बदली झालेले अधिकारी व नेमणुकीचे ठिकाण

सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू बबन आव्हाड(मेहुबणारे) यांची जळगाव जिल्हा विशेष शाखेत बदली झाली असून त्यांच्या जागेवर संदीप सुरेशसिंग परदेशी (नियंत्रण कक्ष)यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गणेश रामदास धुमाळ (निंभोरा, ता.रावेर) यांची जळगाव नियंत्रण कक्षात बदली झाली असून त्यांच्या जागेवर हरीदास शिवराम बोचरे(अमळनेर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ (वरणगाव) यांची रावेर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी भरत यशवंत चौधरी (एमआयडीसीचे सहाय्यक निरीक्षक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच जळगाव शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक वाहतूक निरीक्षक डी.डी.इंगोले यांची जळगाव वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. तसेच जळगाव शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक लिलाधर कानडे यांची पोलिस उपअधीक्षकपदी पदोन्नती झाली असून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

गणेश सुकदेव चव्हाण (जळगाव नियंत्रण कक्ष) यांची अहमदनगर येथे बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.