DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव येथे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार सोहळा

जळगाव –  येथे भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे, जळगाव विभागामार्फत आयोजित नवनिर्वाचित महापौर, नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या “सत्कार सोहळा” कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व भोरगाव लेवा पंचायत कुटुंबनायक श्री. ललितदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून नवनिर्वाचित महापौर, नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे यांच्या वतीने सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार श्री. सुरेश (राजुमामा) भोळे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार श्री. शिरिष चौधरी, जळगाव महापौर सौ. दीपमाला काळे, प्रा. पी. आर. चौधरी, श्री. संजयदादा राणे तसेच श्री. विष्णू भंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.