DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अमळनेरमध्ये व्यापाऱ्याला लुटले; मिरची पूड फेकून साडेपाच लाखांवर डल्ला

अमळनेर – जिल्ह्यात वाढत्या लुटमारीच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. अमळनेरमधील पिंपळे रस्त्यावर स्कूटीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपये लांबविल्याची घटना घडली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन संशयितांना अटक केली आहे.

अमळनेर बाजार समितीतील व्यापारी यतीन कोठारी हे बुधवारी स्कूटीवरून पिंपळे रस्त्यावरील लामा जीनकडे जात होते. याच दरम्यान मोटारसायकलवरून तोंडाला मास्क लावलेले तीन जण त्यांच्या जवळ आले. त्यांनी प्रथम कोठारी यांचा चष्मा हिसकावून दूर फेकला आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कोठारी यांच्या हातातील पैशांची पिशवी खाली पडली.

त्या पिशवीत सुमारे साडेपाच लाख रुपये रोख रक्कम होती. संधी साधत चोरट्यांनी ती पिशवी उचलली आणि तेथून पळ काढला. घटनेनंतर कोठारी यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पथक स्थापन करून संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान तीन जणांना अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.