DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

एमआयडीसी पोलिसांकडून ३ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

आरोपी जेरबंद; सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत

जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करत आरोपीला जेरबंद केले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रकमेसह एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील शिवशंकर नवीन जोशी कॉलनी, जळगाव येथील विवेक पांडुरंग जोशी (वय ४३, नोकरी, महावितरण, जळगाव) यांच्या घरात २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ते २५ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान घरफोडी झाली होती. या घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह एकूण ३ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक २३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०६ नुसार २५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बाबन आव्हाड यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी पथकाला आरोपीचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपाळ सुरेश बागाने (वय ३६, रा. कंजरवाडा, जळगाव) यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

हस्तगत मुद्देमाल

  • २ लाख ७० हजार रुपये किमतीचा २७ ग्रॅम सोन्याचा पोत

  • ५० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

  • ५ हजार रुपये किमतीची ०.५ ग्रॅम सोन्याची अंगठी

  • २० हजार रुपये रोख

एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत भास्कर, शेख विकास, पोलीस कर्मचारी पाटील, गिरीश पाटील, अमोद लक्ष्मणवाणी, नितीन ठाकूर, राहुल वेटे व सुभाष साबळे यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.