क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी भाजप कार्यालयात साजरी
सावदा : शिक्षणाच्या क्षेत्रातील अग्रणी आणि स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी मंगळवार, १० मार्च रोजी भाजप कार्यालय, जीएम फाउंडेशन येथे सकाळी १० वाजता साजरी करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, माजी महापौर सीमा भोळे तसेच प्रदेश सदस्य संतोष इंगळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा पदाधिकारी उदय भलेराव, दीपक परदेशी, अरविंद देशमुख, महेश चौधरी, ललित बडगुजर, सचिन बाविस्कर, विजय वानखेडे, प्रकाश पंडित, पंकज जैन, आशिष सपकाळे, सुरेश सोनवणे, किरण भोई, दिलीप लाडवंजारी, रेखा वर्मा, वंदना इंगळे, भाग्यश्री चौधरी, माधुरी हांडे, रोहित सोनवणे, मंडलाध्यक्ष आनंद सपकाळे, अजित राणे, अतुल बारी, संदीप धंधोरे, महेश पाटील तसेच महिला मोर्चा अध्यक्षा नितू परदेशी, युगधरा साळुंखे, रेखा कुलकर्णी, उषा परदेशी, संगीता पाटील, जितेंद्र चव्हाण, विजय बांदल, सुनील भारंबे, अश्विन सैंदाणे, स्वप्नील साखळीकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
