गोदावरी अभियांत्रिकीत फिनिक्स विजेत्यांचा जल्लोष
जळगाव : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा कलागुणांच्या चालना मिळावी या उदात्त हेतूने महाविद्यालयांमध्ये फिनिक्स 2के26 (टेक्निकल इव्हेंट) कार्यक्रमात विजेत्यांनी जल्लोष केला.
उद्घाटनाप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. वर्षा पाटील या उपस्थित होत्या. विनोद पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे, डॉ. तुषार कोळी, डॉ. ईश्वर जाधव, प्रा. देवेंद्र फेगडे उपस्थित होते. डॉ. वर्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, आपल्या दैनंदिन गरजा ओळखून त्याप्रमाणे नियमावली करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला वेळेचे महत्व कळेल व वेळ वाया जाणार नाही. तसेच अशा प्रकारच्या इव्हेंटमध्ये नेहमी सहभाग नोंदवावा असे सांगितले. फिनिक्स 2026 या कार्यक्रमांमध्ये 700 च्या वर प्रतिस्पर्धींनी सहभाग नोंदविला. बक्षीस समारंभाला फिनिक्स 2 के 26 या कार्यक्रमाचे प्रायोजक इग्नाइट अकॅडमी, पॅशन सॉफ्टवेअर जळगाव, किरण अकॅडमी पुणे, सॉफ्टेड, इलेक्ट्रोसॉफ्ट व एम सॉफ्ट यांची उपस्थिती होती. फिनिक्स पारितोषिक विजेते विद्यार्थीकोड वॉर प्रतीक भदाणे, रीवा चव्हाण, हर्षल बोरसे, प्रणित साळुंखे, पूर्वेस अत्तरदे, पंकज साळी, ओम पाटील, डिंपल भंगाळे, दुर्गेश चौरे, पौर्णिमा थोरात, पंकज सोनार, क्षितिज शहा, राज सूर्यवंशी, मेघराज दंडगव्हाळ, मोनिका राखंडे, देवयानी महाजन, चिन्मय पाटील, अथर्व देशमुख, राजवर्धन ठाकूर, गौतम चंदनी यांनी यश संपादन केले.