DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

लाडकी बहीण योजनेत गैरव्यवहार उघड; अपात्र लाभार्थ्यांकडून कोट्यवधींची वसुली

मुंबई :  राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असून अपात्र लाभार्थ्यांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येतात, मात्र अनेक अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

सरकारने केलेल्या पडताळणीत राज्यातील सुमारे १२,९१५ लाभार्थी अपात्र ठरले आहेत. त्यापैकी ६,४५७ महिलांकडून आतापर्यंत जवळपास ११ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, अपात्र लाभार्थ्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. सुमारे २,६५२ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले असून त्यांनी मिळून अंदाजे ३ कोटी ५८ लाख रुपये घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणात काही रक्कम परत मिळवण्यात आली असून उर्वरित वसुलीची प्रक्रिया सुरू आहे.

महिला व बालकल्याण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित विभागांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. योजनेच्या अटींनुसार सरकारी कर्मचारी महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही, तरीही नियमांकडे दुर्लक्ष करून अर्ज करण्यात आले होते.

दरम्यान, राज्य सरकारकडून अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई सुरू असून पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.