DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गुरुपौर्णिमेनिमित्त प.पू. दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

चिमुकले राम मंदिरात पाद्यपूजन; भाजपच्या वतीने गुरूवंदना कार्यक्रम उत्साहात

जळगाव : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने चिमुकले राम मंदिर येथे वंदनीय परमपूज्य श्री दादाजी महाराज जोशी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या हस्ते पाद्यपूजन करून गुरूवंदना करण्यात आली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने विविध साधू-संत, महात्मे, धर्मगुरू, शिक्षक व विविध क्षेत्रातील गुरुवर्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी आमदार राजूमामा भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते प.पू. दादाजी महाराज जोशी यांचे पाद्यपूजन करून शाल व श्रीफळ देत सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या संयोजिका रेखा वर्मा, माजी जिल्हाध्यक्षा उज्वला ताई, नगरसेवक विशाल भोळे-बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस राहुल वाघ, जिल्हा सहसंयोजिका नंदिनी दर्जी, भाग्यश्री चौधरी, उषा ताई, नीला चौधरी पाठक, राजश्री शर्मा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुतत्त्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांनी गुरूंचे आशीर्वाद घेतले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.