DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात २००+ विद्यार्थ्यांचा सहभाग; नामांकित कंपन्यांकडून थेट भरती प्रक्रिया

जळगाव – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव तसेच लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न झाला. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या रोजगार मेळाव्यासाठी २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रारंभी नोंदणी व मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. त्यानंतर विविध उद्योगसंस्थांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना उपलब्ध पदांची माहिती दिली.यानंतर लेखी परीक्षा, तांत्रिक मुलाखत आणि वैयक्तिक मुलाखत असे विविध टप्पे पार पाडण्यात आले. या मेळाव्यात प्रोफासाईमा ग्लोबल सोल्यूशन्स एलएलपी, त्रिविम टेक्नो क्राफ्ट्स प्रा. लि., प्रोसर इंडस्ट्रीज (पुणे), प्रोटोवोक टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (मुंबई), छबी इलेक्ट्रिकल जळगाव, स्पेशालिटी सिंटर्ड प्रॉडक्ट्स लि. (सातारा), मनराज ऑटोमोबाईल्स (जळगाव), इंगीअर्ज प्रा. लि. सातारा , एनबीटी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (पुणे), किरण मशीन टूल्स जळगाव, स्टार फॅब्रिकेटर्स जळगाव गोदावरी फाउंडेशन तसेच युवा शक्ती फाउंडेशन, क्वेस क्रॉप प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित उद्योगसंस्थांचा सहभाग होता. या संस्थांनी अभियांत्रिकी, यंत्र, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, स्वयंचलन, माहिती तंत्रज्ञान, उत्पादन व व्यवस्थापन क्षेत्रातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली. काही संस्थांनी प्रशिक्षणासह नोकरीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या.या संपूर्ण प्रक्रियेनंतर अधिकाधिक विद्यार्थ्यांची अंतिम निवड होऊन त्यांना नोकरीच्या संधी देण्यात आल्या.उपक्रमासाठी डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव) व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.या यशस्वी उपक्रमामागे महाविद्यालयाचा प्रशिक्षण व नियोजन विभाग, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा मोठा वाटा आहे. विविध उद्योगसंस्थांची उपस्थिती आणि उल्लेखनीय निवड यामुळे हा रोजगार मेळावा अत्यंत यशस्वी ठरला असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.सदर रोजगार मेळाव्याच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील(सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.
बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.