DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

जळगाव : येथील आदित्य अशोक चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी परीक्षेत ९०% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तो सेंट टेरेसा स्कूलचा विद्यार्थी असून त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

आदित्य याने नियमित अभ्यास, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले. शालेय जीवनातही त्याने सातत्याने गुणवत्तापूर्ण प्रगती राखली असून शालेय स्तरावरील खेळ तसेच चित्रकला उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

भविष्यात इंजिनिअर होण्याचे त्याचे ध्येय आहे. त्याचे वडील अशोक चौधरी हे जैन इरिगेशन संस्थेत ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. आदित्यच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोकभाऊ जैन तसेच आई सौ. रंजना चौधरी, वडील अशोक चौधरी, आजी-आजोबा, शिक्षकवृंद, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.