DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सोने-चांदी दरात घसरण; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाची बाजारात चर्चा

जळगाव : इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता वाढली असून त्याचा परिणाम भारतीय सराफ बाजारावरही दिसून येत आहे. सोने आणि चांदीच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्याने बाजारात मोठी चर्चा रंगली आहे.

आज सोमवार, 11 मे 2026 रोजी सराफ बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात किरकोळ घसरण नोंदविण्यात आली. जळगावसह मुंबई, दिल्लीसारख्या प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव कमी झाल्याचे दिसून आले. 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 52 हजार 350 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 39 हजार 650 रुपये राहिला. मागील दरांच्या तुलनेत सुमारे 200 रुपयांची घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

दुसरीकडे, चांदीचे दर मात्र स्थिर राहिले असून सलग तिसऱ्या सत्रात कोणताही मोठा बदल दिसून आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, हैदराबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आर्थिक शिस्त पाळण्याचे आवाहन केले. “अनावश्यक खर्च टाळा, पेट्रोल-डिझेलचा संयमाने वापर करा, विदेश दौरे कमी करा आणि खाद्यतेलाचा वापर मर्यादित ठेवा,” असे सांगतानाच त्यांनी पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचेही आवाहन केले.

पंतप्रधानांच्या या विधानाचा भारतीय सराफ व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी काळात बाजारातील स्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.