DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आ. सुरेश भोळे ‘राजूमामा’ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार

वृक्षारोपण, रक्तदान, अन्नदान, फळवाटप व शालेय साहित्य वाटपासह विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव : जळगाव शहराचे आमदार तथा लोकप्रिय लोकप्रतिनिधी आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि. १३ जून रोजी भारतीय जनता पार्टी जळगाव महानगरच्या वतीने विविध सामाजिक व लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, सभागृह नेते नितीन लड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडणार आहेत.

या उपक्रमांत वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, अन्नदान, फळवाटप, शालेय साहित्य वाटप, गरजू विद्यार्थ्यांना कपडे वाटप, गोशाळेत गाईंना चारा वाटप, वाहतूक पोलिसांना पाणी व थंड पेय वितरण तसेच महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी वाटप आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

सकाळपासून सायंकाळपर्यंत शहरातील विविध मंडळे, महिला मोर्चा, युवा मोर्चा तसेच राजूमामा भोळे मित्रपरिवार यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या सर्व कार्यक्रमांना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, नगरसेवक, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, भारती सोनवणे, नितीन इंगळे, जयेश भावसार आणि जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.