DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

१४ वर्षांखालील जिल्हा क्रिकेट संघ निवड चाचणी रविवारी

जळगाव : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १४ वर्षांखालील जिल्हा क्रिकेट संघाच्या निवडीसाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता अनुभूती इंटरनॅशनल स्कूल, शिरसोली मार्ग येथे करण्यात आले आहे.
दि. १ सप्टेंबर २०१२ किंवा त्यानंतर जन्म झालेल्या खेळाडूंनाच या निवड चाचणीत सहभागी होता येणार आहे. इच्छुक खेळाडूंनी पूर्वनोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज (https://forms.gle/rMWH8vvfKzeVWEWp6) फॉर्म भरून नियोजित वेळेत निवड चाचणीस उपस्थित राहावे, असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनने केले आहे.
निवड चाचणीस येताना खेळाडूंनी आधार कार्ड, जन्मतारखेचा मूळ डिजिटल दाखला (केवळ ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्याकडून जारी केलेला) सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच निवड चाचणी शुल्क ₹१०० भरावे लागणार आहे.
अधिक माहितीसाठी मोहम्मद फजल यांच्याशी ९८३४१९७०७० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.