महापौर दिपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
जळगाव : भारतीय जनता पक्ष मंडळ क्र. ५ (पिंप्राळा परिसर) यांच्या वतीने सोमवार (दि. १३ जुलै) रोजी जळगाव शहराच्या महापौर सौ. दिपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी भाजप मंडळ क्र. ५ चे अध्यक्ष अतुल बारी, नगरसेविका जयश्री राहुल पाटील, भाजप महिला मोर्चा मंडळ क्र. ५ च्या अध्यक्षा माधुरी हांडे, महिला मोर्चाच्या पदाधिकारी रेखा कुलकर्णी, मंदा सोनवणे, गीता शुक्ला, चव्हाण मॅडम, मंडळाचे सरचिटणीस उमेश सूर्यवंशी, भाजप जळगाव महानगर चिटणीस राहुल पाटील, महानगर उपाध्यक्ष सागर पाटील, नूरभाई मोहम्मद, दीपक भुसारी, किरण भोई, राज कोळी, राकेश पाटील, रवी पाटील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने अधिकाधिक वृक्ष लागवड व संगोपन करण्याचे आवाहन केले.
