जिल्हा परिषद शाळा हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भक्कम पाया – पालकमंत्री गुलाबराव पाटील
चोरगाव जि.प. शाळेत १२५ विद्यार्थ्यांना शासकीय गणवेश व जीपीएस ग्रुपमार्फत वह्यांचे वाटप
पाळधी /जळगाव : जिल्हा परिषद शाळा हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भक्कम पाया आहे. जिल्हा परिषद शाळांमधूनही अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यश मिळवत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देऊन शाळेची पटसंख्या वाढवावी. शासन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत असून, प्रत्येक विद्यार्थ्याने या संधीचे सोनं करावं असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्राथमिक विद्यामंदिर, जि.प. शाळा, चोरगाव येथे १२५ विद्यार्थ्यांना शासनातर्फे शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले. तसेच जीपीएस ग्रुपच्या माध्यमातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सर्व १२५ विद्यार्थ्यांना वह्यांचेही वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक भूषण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक रमेश बोरसे यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक प्रकाश बडगुजर यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी सरपंच नाना सोनवणे, उपसरपंच प्रवीण पवार, ग्रामपंचायत सदस्य जगन सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैशाली सोनवणे, उपाध्यक्ष प्रवीण सोनवणे, शिक्षक दारासिंग राठोड, जयवंतराव पाटील, सुनंदा कोळी यांच्यासह पालक, विद्यार्थी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.