DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवायज्ञ; महिनाभर विविध उपक्रमांचा संकल्प

आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत बैठकीत कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित

जळगाव : भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्हा महानगराची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी जी. एम. फाउंडेशन येथील भाजप कार्यालयात आमदार सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध सेवाभावी उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी पक्षातील ज्ञात-अज्ञात दिवंगत कार्यकर्त्यांसह नेपाळ येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीताने बैठकीस सुरुवात झाली.

जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी ३१ ऑगस्ट रोजी पुणे येथे झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतील ठरावांची माहिती पदाधिकाऱ्यांना दिली. तसेच आगामी पक्षीय कार्यक्रमांची रूपरेषा आणि जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन केले.

आमदार सुरेश भोळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान सेवा उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. यामध्ये आशीर्वादाचा दिवा, स्वप्नांचा भारत चित्रकला व भाषण स्पर्धा, नमो सेवा गाथा नाट्य सादरीकरण, अंगणवाडी सेविकांचा सन्मान, विकासकामांची रील स्पर्धा, सेवा दीप यात्रा, सेवा व आपले योगदान, सेवा सेतू अभियान, रांगोळी स्पर्धा, विकसित भारत संकल्प यात्रा, इनोव्हेशन चॅलेंज, जनसेवेचा महाकुंभ, पवित्र जल संकलन तसेच वडनगर ते वाराणसी यात्रेसह विविध उपक्रमांचा समावेश आहे.

या उपक्रमांमध्ये महानगरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. आगामी कार्यक्रमांच्या विविध जबाबदाऱ्यांबाबत महापौर दीपमाला काळे, विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, दीपक परदेशी, महेश पाटील, ललित बडगुजर आणि शिरीष तायडे यांनी उपस्थितांना माहिती दिली.

बैठकीला महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, प्रदेश महिला उपाध्यक्षा रेखाताई वर्मा, महिला आघाडी अध्यक्षा नीतूताई परदेशी, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील यांच्यासह जिल्हा महानगरातील पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, आघाडीचे अध्यक्ष आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन नितीन इंगळे यांनी केले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.