DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मनपा स्तरीय आंतरशालेय खो-खो स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हा क्रीडा संघ मैदानावर दि. १ ऑक्टोबर रोजी झालेल्या या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात एकूण १६ संघांनी सहभाग घेतला. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या संघाचा पराभव करत अनुभूती स्कूलने विजेतेपद मिळविले.
या शानदार विजयामुळे अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाची पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द, शिस्त आणि सांघिक भावनेच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
या यशासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षिका श्वेता कोळी तसेच शिवम सोनवणे यांचे विद्यार्थ्यांकडून कसुन सराव करून घेतला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल स्कुल मधील सर्व शिक्षकवृदांनी कौतुक केले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.