DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

औद्योगिक प्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञानासह गांधी विचारांचा घेतला अनुभव

जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी जैन व्हॅली येथील जैन फार्म फ्रेश फूड लिमिटेड तसेच जैन हिल येथील गांधी तीर्थ येथे औद्योगिक व शैक्षणिक भेट दिली.
विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती, आधुनिक तंत्रज्ञान तसेच सामाजिक मूल्यांची माहिती मिळावी, हा या भेटीचा उद्देश होता.जैन फार्म फ्रेश फूड लिमिटेड येथे विद्यार्थ्यांनी केळी, आंबा व मसाले प्लांटला भेट देऊन कृषी उत्पादनांवरील प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग तसेच आधुनिक यंत्रसामग्री, ऑटोमेशन आणि इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणाली याचबरोबर उद्योगांमध्ये सेन्सर्स, ऑटोमेशन व कंट्रोल सिस्टमचा वापर कसा केला जातो, याचे प्रत्यक्ष निरीक्षण केले.यानंतर गांधी तीर्थ येथे विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याचा आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाचा घेत सत्य, अहिंसा, स्वावलंबन, सामाजिक समता व राष्ट्रसेवा या गांधी विचारांची मुल्य समजावून घेतले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना वर्गातील सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष औद्योगिक प्रक्रियांशी संबंध जोडता आला. तसेच त्यांचे तांत्रिक आकलन, निरीक्षण क्षमता व व्यावसायिक कौशल्यांना चालना मिळाली. यावेळी विभागाचे प्रा. डॉ. ईश्वर जाधव, प्रा. डॉ. देवेंद्र मराठे, प्रा. राजेंद्र पाटील आणि प्रयोगशाळा सहाय्यक निर्भय नेमाडे उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.