DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आठ दिवसांत दोन चुलत भावांचा मृत्यू; एचआयव्ही संसर्गाने खळबळ

लखनऊ: दोन चुलत भावांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अवघ्या आठ दिवसांच्या अंतरानं जगाचा निरोप घेतला. HIV ची लागण झालेल्या महिलेशी शरीर संबंध ठेवल्यानं त्यांचा मृत्यू झाला. याच महिलेनं परिसरातील अनेक तरुणांशी शरीर संबंध ठेवल्याचा आरोप आहे. दोन चुलत भावांच्या मृत्यूनंतर परिसरात दहशत पसरली आहे. पोलीस आणि आरोग्य विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये असलेल्या आदोपूर परिसरातील सोसायटीत वर्षभरापूर्वी एक महिला भाड्यानं राहण्यास आली होती. काही दिवसांनी तिच्या घरात सोसायटी आणि परिसरातील तरुणांची ये-जा वाढू लागली. जवळपास ६ महिन्यांपूर्वी सोसायटीतील दोन चुलत भावांची प्रकृती बिघडली. कुटुंबियांनी त्यांना स्थानिक डॉक्टरांकडे नेलं. पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. पुढे बिजनौर, ऋषिकेशच्या एम्स आणि देहरादूनपर्यंत उपचार करण्यात आले.
उपचार सुरू असताना दोन्ही तरुणांच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यातून दोघांना HIVची लागण झाल्याचं समोर आलं. संक्रमण वाढल्यानं दोघांची प्रकृती दिवसागणिक ढासळत गेली. उपचार सुरू असताना ८ दिवसांपूर्वी एकाचा मृत्यू झाला. तर बुधवारी दुसऱ्या भावानंही जीव सोडला. दोघांच्या मृत्यूनंतर परिसरातील रहिवाशांची चिंता वाढली आहे.
आजारामुळे गंभीर स्थितीत असताना एका तरुणानं सोसायटीतील महिलेच्या संपर्कात आल्याचं कुटुंबियांना सांगितलं. सोसायटीत भाड्यानं राहात असलेल्या महिलेच्या संपर्कात आलो होतो, असं तरुणानं मृत्यूच्या काही दिवस आधी कुटुंबाला सांगितलं. त्यानं त्याच्या चुलत भावालाही त्या महिलेकडे ये-जा करताना पाहिलं होतं.
परिसरातील दोन तरुणांना HIV ची लागण झाल्याचं कळताच महिलेनं राहतं घरी रिकामी केलं. ती अचानक सोसायटी सोडून निघून गेली. तिची ओळख आणि आताचं ठिकाण समोर आलेलं नाही. महिला ज्या घरात वास्तव्यास होती, त्या घराच्या मालकाशी संपर्क साधून महिलेबद्दल अधिकची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
बिजनौरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकेंद्र यादव यांनी गेल्या ५ ते ६ महिन्यांत एचआयव्ही चाचणी करणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचं सांगितलं. अनेक संक्रमित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.