संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण
जळगाव : भारतीय संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगर जळगावच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमात महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी व कार्याध्यक्ष राजुभाऊ मोरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

याप्रसंगी जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना संविधान दिनाचे महत्त्व विशद केले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने संविधान स्वीकारले, तर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतीय संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार प्रदान केले असून, नागरिकांना कर्तव्यांचीही जाणीव करून दिली आहे. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये भारतीय लोकशाहीचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार महानगर जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी यांनी मानले. यावेळी प्रा. जयप्रकाश महाडिक, किरणभाऊ राजपूत, गणेशभाऊ पाटील, राजुभाऊ बाविस्कर, विशालभाऊ देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.