रेडक्रॉसतर्फे एचआयव्ही ग्रस्त महिला भगिनींना हायजेनिक किट्सचे वाटप
जळगाव | प्रतिनिधी
इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव आणि जाणीव बहूउद्देशिय संस्था यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एचआयव्ही बाधित महिला भगिनींना हायजेनिक किट्सचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.वैशाली कुर्हाडे, रेडक्रॉसचे चेअरमन श्री.विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, कार्यकारिणी सदस्या डॉ. अपर्णा मकासरे,कार्यकारिणी सदस्य श्री. अनिल शिरसाळे, जाणीव बहूद्देशीय संस्थेच्या सौ. मनीषाताई बागूल, श्री. प्रवीण पाटील, प्रशासकीय अधिकारी. श्री. लक्ष्मण तिवारी, श्रीमती.शालिनीताई पगारे, सौ. शारदा पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक करताना सौ. मनीषाताई बागूल म्हणाल्या की एचआयव्ही बाधित रुग्णांना बर्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रेडक्रॉससारख्या सामाजिक संस्थांच्या मदतीने सर्व भगिनी आणि बालकांना योग्य ती मदत करणे शक्य होते.*
डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी यांनी रक्तकेंद्राच्या कामाची माहिती देत भविष्यात कुणाला रक्ताची गरज पडल्यास संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन देत सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. केले. डॉ.अपर्णा मकासरे यांनी हायजेनिक कीट बद्दल माहिती देऊन आपण स्वतःला शारीरिक आणि मानसिक स्वस्थ ठेवण्यासाठी कशी काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती दिली. सौ. वैशाली कुऱ्हाडे यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.