DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली; नूतन जिल्हाधिकारीपदी अमन मित्तल

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijeet Raut) यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आज त्यांची बदली (Transfer) करण्यात आली आहे. गुरुवारी राज्य शासनाने आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या, त्यात राऊत यांची नांदेड जिल्हाधिकारी (Nanded Collector) म्हणून बदली करण्यात आली. जळगाव जिल्हाधिकारी म्हणून लातूर मनपाचे आयुक्त अमन मित्तल (Aman Mittal) यांची निवड करण्यात आली आहे.

जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून जळगाव जिल्ह्यातून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी लातूर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश प्रधान सचिव डॉ.राजगोपाल देवरा यांनी जारी केले आहेत.

अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली होईल अशा चर्चा सुरू होत्या. अभिजीत राऊत यांनी आपल्या जिल्हाधिकारी असण्याच्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यातील कोरोना चांगल्या रितीने हाताळला. यामुळे त्यांचे राज्यभर कौतुक झाले. मात्र अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली झाली आहे.

जळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी अमन मित्तल हे लातूर महापालिकेचे आयुक्त आहेत. त्यांची जळगाव जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. नूतन जिल्हाधिकारी अमन मित्तल हे २०१५ बॅचचे जिल्हाधिकारी असून त्यांची आजवरची कारकीर्द उत्तम राहिली आहे. मित्तल यांनी नाशिक, कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर मनपा आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. महापूर काळात आणि कोरोना काळात त्यांनी आघाडीवर राहून काम केले होते.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.

Divyasarthi News WhatsApp Group