DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेर यांच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन

जामनेर | प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावाहून सोयगाव जाणारा दोन किलोमीटरचा रस्ता हा तब्बल पाच वर्षापासून काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाने हाती घेतला आहे परंतु तो पूर्ण होत नसल्यामुळे रहिवाशांनी आज रस्ता रोको आंदोलन केले.

शेंदुर्णी सोयगाव रोड हा सात किलोमीटरचा असून त्यातून केवळ तीन किलोमीटर हा सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेरच्या अतिरिक्त येतो त्यातही दोन किलोमीटरचा रस्ता हा शेंदुर्णी शहरातून जातो रस्त्याची स्थिती हलाकीची झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागांनी गेल्या पाच वर्षापूर्वी सदर रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले त्याकरता जागोजागी खड्डे केले व ठीक ठिकाणी मातीचे मुरमाचे डिगारे टाकून ठेवले परंतु कामच सुरू केले नाही त्याचा रहिवाशांना त्रास होतो त्या रस्त्याने मंदिर मज्जिद शाळा व रहिवासी घरे दुकाने आहेत वारंवार अर्ज करून विनंत्या करूनही त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग हेतू पुरस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाहनधारकांनी यावेळी केला.

यावेळी जामनेर उपविभागाचे शाखा अभियंता आर डी पाटील साहेब , चेन्नेवार साहेब , एस. व्हि.चौधरी , यांनी निवेदन स्वीकारले व काम लागेच सुरू होत असून पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास नेऊ असे सांगितले व लेखी पत्र दिले सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेरचे अधिकाऱ्यांना यावेळी आंदोलनकर्त्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला ,
कायदा सुव्यवस्था कामी पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी प्रतापराव इंगळे साहेब शेंदुर्णी आऊट पोस्ट चे पोलीस अधिकारी दिलीप पाटील साहेब , मनोज गुजर आदींनी चौक बंदोबस्त ठेवला.

सूत्रसंचालन सुनील गुजर यांनी केले आंदोलन कर्त्याच्या वतीने पंडितराव जोहरे, फरीद खान, नीलम कुमार अग्रवाल ,शिवसेना शहर प्रमुख भैय्या सूर्यवंशी, मोहम्मदिया उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख अबरार सर ,राहुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी फरीद शेख ,हमीद शेख ,नगरसेवक शरद बारी, पंडितराव जोहरे ,शिवसेना शहर प्रमुख संजय सूर्यवंशी ,राष्ट्रवादी चे स्नेहदीप गरुड , जुबेर शेख, शकील शेख ,अश्फाक शेख ,वैभव पाटील ,सुनील पाटील ,राहुल पाटील, निलेश बाविस्कर ,अनिल झंवर , आरिफ खान, शेख अब्रार सर, वाहिद अली, राजू गुजर ,जाफर शेख, खालिद शेख, शकील शेख, इमरान शेख, सै. निसार, निसार वायरमन, सोहेल शेख,  शेख रईस, प्रवीण कापुरे, जमीर पिंजारी व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ,
या आंदोलनात उपस्थित शिवसैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेंदुर्णी शहर प्रमुख भैया भाऊ गुजर ,ज्येष्ठ शिवसैनिक बारकू जाधव ,नितीन गुजर, राजू पाटील, तुकाराम पाटील ,
भूषण बडगुजर, सुनील बारी, अजय भोई ,विलास बारी, नितीन गुजर ,व असंख्य मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.

Divyasarthi News WhatsApp Group